Bharat Jadhav
हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व दिले जाते. पूजा केल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद मिळत असतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
काही लोक उभे राहूनही पूजा करतात. तर काही लोक बसून पूजा करतात. पण पूजा करण्याची पद्धत कोणती योग्य आहे ते जाणून घेऊ.
धार्मिक शास्त्रानुसार पूजा करताना उभे राहणे अशुभ मानले जाते. उभे राहून पूजा केल्याने कोणतेही फळ मिळत नाही, असं म्हटलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार, उभे असताना कधीही पूजा करू नये, कारण हे शास्त्रीय नियमांच्या विरुद्ध मानले जाते.
उभे राहून पूजा केल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद मिळत नाही, त्यामुळे घरात दारिद्र्य येते आणि आर्थिक नुकसानही होते.
उभे राहून पूजा केल्याने निर्णय घेण्याची क्षमता बिघडू शकते आणि देव देखील नाराज होऊ शकतो.
पूजा करताना नेहमी चटईवर बसावे. पूजेनंतर आरतीसाठी उभे राहावे. तसेच पूजा करताना डोके झाकले पाहिजे.