Priya More
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेमप्लेट लावली जाते. नेमप्लेट हे घराच्या ओळखीचे प्रतीक असते. त्याचे साहित्य आणि दिशा घरात प्रवेश करणाऱ्या उर्जेवर प्रभाव टाकतात
वास्तुशास्त्रानुसार घराची नेमप्लेट धातूची, लाकडाची की दगडाची यापैकी कोणती शुभ मानली जाते हे आपण पाहणार आहोत.
लाकूड हे वाढ, स्थिरता आणि समृद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे, घरांसाठी लाकडी नेमप्लेट शुभ मानली जातात.
सागवान, रोझवूड, महोगनी आणि आंब्याच्या लाकडासारख्या मजबूत लाकडांचा वापर करु तुम्ही नेमप्लेट तयार करू शकता.
प्लायवूड, एमडीएफ किंवा प्लास्टिकपासून बनवलेले नेमप्लेट वापरणं टाळा असा सल्ला दिला जातो. कारण ते फक्त शोसाठी असते.
वास्तूशास्त्रानुसार धातूच्या नेमप्लेटचा संबंध संपत्ती आणि नवीन संधींशी जोडला जातो. पितळ, तांबे, पोलाद आणि लोखंड यांसारख्या धातूंचा वापर करून आकर्षक नेमप्लेट तुम्ही तयार करू शकतात.
पितळेचे नामफलक घरासाठी शुभ मानले जातात. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेत पितळेचे नेमप्लेट लावले तर धन आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते.
दगड हे पृथ्वी तत्त्वाशी संबंधित आहे. ते सामर्थ्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. संगमरमर, ग्रॅनाइट आणि इतर नैसर्गिक दगडांपासून बनवलेल्या नेमप्लेट्स घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावता येतात
वास्तुशास्त्रानुसार, संगमरमर, ग्रॅनाइट आणि इतर नैसर्गिक दगडांपासून बनवलेल्या नेमप्लेट हे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाशी देखील संबंधित आहे.
नैऋत्य आणि वायव्य दिशा दगडी नामप्लेट्ससाठी शुभ मानल्या जातात. नैऋत्य दिशेला नेमप्लेट लावल्याने कुटुंबप्रमुखाची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढू शकतो.