Manasvi Choudhary
जेवायला बसण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायला हवेत. जेणेकरून बाहेरील किटाणू तुमच्या पोटात जाणार नाही.
जेवताना नेहमी खाली आसन ग्रहण करून म्हणजेच मांडी घालून बसले पाहिजे. खाली बसल्यामुळे तुमची पचनसंस्था सुरळीत होते.
जेवताना तुमचे लक्ष नेहमी तुमच्या ताटात असले पाहिजे. इकडे तिकडे लक्ष देऊन जेवल्यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या निर्माण होते.
जेवण करताना शांतचित्ताने जेवावे. बडबड करू नये. कारण जेवताना ठसका लागून अन्न श्वसननलिकेत अडकण्याची शक्यता असते.
जेवताना टीव्ही, मोबाइल बघू नये. शांतचित्ताने एकाग्रतेने जेवावे. म्हणजे तुम्ही सुदृढ आणि निरोगी व्हाल.
जेवणानंतर गुळाचा खडा खा. जेणेकरून तुम्ही जे खाल्लं आहे ते तुम्हाला पचायला सोपे जाईल.
जेवणानंतर हात स्वच्छ धुवावेत. जेणेकरून तुमच्या हाताला चिकटलेले आणि नखांमध्ये अडकलेले अन्न स्वच्छ होईल