Surabhi Jayashree Jagdish
आज आम्ही तुम्हाला काही अशा वास्तु टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं पालन केल्यास तुमच्या घरात धनवर्षा होऊ शकते.
दिवाळीपूर्वी जर तुम्ही घराच्या उत्तरेकडे तिजोरी ठेवली, तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात धनप्राप्ती होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असते.
जे लोक मोठ्या कर्जाच्या समस्येत अडकलेले आहेत, त्यांनी घराच्या दक्षिण दिशेत दागिने ठेवावेत. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. लवकरच तुमचे काम मार्गी लागू शकते.
दिवाळीपूर्वी घराच्या दक्षिण दिशेत कागदपत्रे ठेवण्याने तुमची प्रगती झपाट्याने होऊ शकते. दिवसेंदिवस होणारी ही प्रगती तुमचे नशीब खुलवू शकते.
वास्तुशास्त्रानुसार, जे लोक घराच्या दक्षिण दिशेत कुबेर यंत्र ठेवतात, त्यांच्यावर कुबेर देव प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.
घराच्या दक्षिण दिशेत माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्याने दीर्घकाळापासून अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यवसायातही तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
तुम्ही याची विशेष काळजी घ्यायला हवी की घराच्या उत्तरेकडे कधीही चप्पल किंवा कचरा ठेवू नये. हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानलं जातं.