Urine Infection : फक्त युरिन इन्फेक्शन नाही, महिलांना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो 'या' आजारांचा

Shreya Maskar

युरिन इन्फेक्शन

जास्त आर्द्रता आणि दमट कपड्यांमुळे जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते, ज्यामुळे अनेक महिलांना पावसाळ्यात युरिन इन्फेक्शनची समस्या उद्भवते.

Urine infection | pinterest

यीस्ट संसर्ग

दमट हवा आणि घामामुळे प्रायव्हेट पार्टचा नैसर्गिक pH बिघडतो, ज्यामुळे बॅक्टेरियल व्हॅजिनोसिसचा धोका वाढतो.

Yeast infection | pinterest

पीरियड्स

दमट हवामानात पॅड्स वारंवार न बदलल्यामुळे स्थानिक पुरळ, जळजळ आणि जिवाणू संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात विशेषता मासिक पाळी दरम्यान महिलांना अधिक स्वच्छता बाळगावी.

periods | pinterest

त्वचेला संसर्ग

नायटा, इंटरट्रिगो आणि ॲथलीट फूट त्वचेच्या घड्यांमध्ये आणि ओलसर पादत्राणांमध्ये वाढतात. त्यामुळे महिलांनो पावसाळ्यात शरीराचा प्रत्येक अवयव किंवा भाग कोरडा राहिल याची काळजी घ्या.

Skin infection | pinterest

टाळूला समस्या

टाळूवर जास्त काळ ओलावा राहिल्याने कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीची वाढ होते आणि केस जास्त गळतात.

Palate problem | pinterest

ओले कपडे टाळा

महिलांनी पावसाळ्यात ओले कपडे त्वरित बदला, केवळ उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी प्या. तसेच कोणतेही दुखणे किंवा ॲलर्जी अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Avoid wet clothes | pinterest

वैयक्तिक स्वच्छता

महिलांनी पावसाळ्यात वैयक्तिक स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष द्या. सार्वजनिक शौचालय वापरताना विशेष काळजी घ्या. वारंवार हात धुवा.

Personal hygiene | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात रोजच्या जेवणात 'ही' १ भाजी खा, युरिन इन्फेक्शनपासून होईल बचाव

Urine Infection | AI PHOTO
येथे क्लिक करा...