Shreya Maskar
पावसाळ्यात जास्त आर्द्रता, बराच वेळ ओले कपडे अंगावर असणे, कमी पाणी पिणे आणि अस्वच्छ सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करणे यांमुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (UTI) धोका वाढतो.
युरिन इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी 'क्रॅनबेरीज' हे फळ सुपरहेल्दी मानले जाते.
क्रॅनबेरीजमध्ये 'ए-टाइप प्रोअँथोसायनिडिन' नावाची सक्रिय संयुगे असतात. ही ई. कोलाईसारख्या हानिकारक जीवाणूंना मूत्रमार्ग आणि मूत्राशयाच्या भिंतींना चिकटण्यापासून रोखतात. जीवाणू चिकटू शकत नसल्यामुळे, लघवी करताना ते सहजपणे शरीराबाहेर वाहून जातात.
मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (UTI) रोखण्यासाठी साखर न घातलेला क्रॅनबेरीचा रस किंवा अर्क खा. अतिरिक्त साखरेमुळे नको असलेल्या जीवाणूंची वाढ होऊ शकते.
क्रॅनबेरीज हे फळ बाजारात सहज उपलब्ध मिळते. तसेच क्रॅनबेरीज अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यात पाणी, कर्बोदके आणि फायबर भरपूर असते.
युरिन इन्फेक्शन रोखण्यासाठी तुम्ही क्रॅनबेरीजसोबत ब्लूबेरीज, कलिंगड, केळी, पेअर ही फळे देखील खाऊ शकता.
युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी, दररोज भरपूर पाणी प्या, वेळोवेळी लघवीला जा. शौचालय वापरताना स्वच्छतेची काळजी घ्या. तसेच वैयक्तिक स्वच्छता जपा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.