Skoda Kushaq २०२६ फेसलिफ्टमध्ये होणार जबरदस्त बदल, ग्राहकांना मिळतील प्रीमियम फीचर्स आणि नवे डिझाइन

Dhanshri Shintre

Skoda Kushaq २०२६

स्कोडा ऑटो इंडियाने कुशाक एसयूव्ही बाजारात उतरवून चार वर्षे पूर्ण केली असून, आता या मॉडेलचे अपडेटेड व्हर्जन लवकरच लॉन्चपूर्वी टेस्टिंगदरम्यान दिसले आहे.

skoda kushaq 2026

बदल व नवे फीचर्स

२०२६ स्कोडा कुशाक फेसलिफ्टमध्ये विद्यमान इंजिन कायम ठेवले जाणार असून, काही कॉस्मेटिक बदल व नवे फीचर्स मिळतील. ही एसयूव्ही हुंडई क्रेटा, किआ सेल्टोस आणि मारुती ग्रँड विटाराशी टक्कर देईल.

skoda kushaq 2026

कनेक्टेड डीआरएलसह नवीन हेडलॅम्प

अपडेटेड स्कोडा कुशाकमध्ये सुधारित ग्रिलसह पातळ उभ्या स्लॅट्स, कनेक्टेड डीआरएलसह नवीन हेडलॅम्प डिझाइन आणि खालच्या भागात बसवलेली फॉग लॅम्प असेंब्ली पाहायला मिळेल.

skoda kushaq 2026

आकर्षक लूक

या एसयूव्हीमध्ये नवीन कोडियाकप्रेरित कनेक्टेड टेललॅम्प, बदललेले फ्रंट-रियर बंपर आणि नव्या डिझाइनचे अलॉय व्हील्स असतील, ज्यामुळे तिचा ताजा आणि आकर्षक लूक अधिक खुलून दिसेल.

skoda kushaq 2026

सविस्तर माहिती

आतील बदलांविषयी सविस्तर माहिती सध्या उपलब्ध नाही. मात्र, २०२५ स्कोडा कुशाक फेसलिफ्टमध्ये नव्या अपहोल्स्ट्रीसह ताजे ट्रिम पर्याय मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते.

skoda kushaq 2026

लेव्हल-२

नवीन कुशाक फेसलिफ्टमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल-२ एडीएएससारखी अपग्रेडेड वैशिष्ट्ये असतील, तर १०-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्ले सध्याच्या मॉडेलप्रमाणेच कायम राहतील.

skoda kushaq 2026

फिचर्स

या कारमध्ये ८-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ८-स्पीकर साउंड सिस्टम, वायरलेस चार्जर, रियर व्हेंटसह ऑटो एसी, ६ एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, ३६०-डिग्री कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX सीट अँकरेज मिळतील.

skoda kushaq 2026

पेट्रोल इंजिन

२०२५ स्कोडा कुशाक फेसलिफ्टमध्ये १.०-लिटर टीएसआय आणि १.५-लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन मिळतील, जे अनुक्रमे ११५पीएस/१७८एनएम आणि १५०पीएस/२५०एनएम पॉवर व टॉर्क निर्माण करतील.

skoda kushaq 2026

NEXT: स्टाइल आणि परफॉर्मन्सची मिलाफ, नवीन मारुती एर्टिगा मोठ्या फीचर्ससह लाँच

येथे क्लिक करा