Todays Horoscope: 'या' राशींसाठी नकोसे खर्च वाढू लागतील; जाणून घ्या राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

या राशीचा स्वभाव मूळचा गळून पडेल. आनंदासाठी सर्व काही कराल. सकारात्मकता वाढीला लागेल.

वृषभ

विनाकारण मानसिकता घालमेलीची राहील. प्रेमामध्ये सुद्धा अपयश संभवते आहे. काळजी घ्या.

मिथुन

नको असणारे खर्च आणि कटकटी वाढतील. एका बाजूला काही चांगल्या घटना ज्या जुन्या गुंतवणुकीशी निगडित केल्या होत्या त्यामध्ये भरभराट होईल.

कर्क

कामाच्या ठिकाणी बदलीचे आणि फीरतीचे योग आहेत. नेटाने,सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहाल.

सिंह

जीवनात जे चालू आहे जे मिळाले आहे याविषयी आज कृतज्ञता बाळगाल. थोडा दानधर्म आणि अध्यात्माकडे कल राहील असे दिसते आहे.

कन्या

काही गोष्टी शारीरिक मेहनतीपेक्षा बौद्धिक चाल आज खेळाल. मुळामध्ये अपेक्षित यश गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल.

तूळ

प्रेमाच्या आठवणीत मन रमेल. मनोरंजनात्मक गोष्टी घडतील.

वृश्चिक

आपल्या वाईटावर असणाऱ्या लोकांना आज आयते कोलीत हातात मिळेल. नको असलेल्या गोष्टींचा भडीमार आपल्यावर होईल.

धनु

दत्तगुरूंची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे. धनलाभ मध्ये भर पडेल.

मकर

जुने घर नवे करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज त्या कामाला मुहूर्त मिळेल. दिवस संमिश्र आहे.

कुंभ

महत्त्वाच्या गोष्टी आज ठामपणे करा. वेगळा आत्मविश्वास घेऊन वावराल. संशोधनात्मक कार्य आज आपल्याकडून होईल.

मीन

धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. आपल्या चांगल्या स्वभावामुळे कुटुंबीयांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

Wakad Tourism: पुण्याजवळ फिरायचंय? मग एका दिवसात वाकडची ट्रिप नक्की प्लान करा

येथे क्लिक करा