Shruti Vilas Kadam
अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी बेकिंग सोडा त्वचेवर घासणे टाळावे. डॉक्टरांच्या मते, त्याऐवजी योग्य स्किनकेअर उत्पादनांचा वापर करणे चांगले.
काळेपणा कमी करण्यासाठी ग्लायकोलिक अॅसिड क्रीम वापरता येऊ शकते. यामुळे काळेपणा हळूहळू कमी होण्यास मदत होऊ शकते.
अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी एमिलॅक क्रीम वापरण्याचा पर्यायही सांगण्यात आला आहे. मात्र, संवेदनशील त्वचा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी लूफाने त्वचा जोरात घासल्यास रॅशेस आणि काळेपणा वाढू शकतो. त्यामुळे सौम्य साबणाने हाताने हलक्या पद्धतीने स्वच्छता करावी.
दुर्गंधी कमी करण्यासाठी थेट त्वचेवर परफ्यूम किंवा डिओ लावण्याऐवजी माइल्ड रोल-ऑन वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी वारंवार क्रीम किंवा गरम वॅक्सिंग केल्याने त्वचेचा काळेपणा वाढू शकतो. डॉक्टरांनी लेझर हेअर रिडक्शन हा पर्याय सांगितला आहे.
अंडरआर्म्सची त्वचा संवेदनशील असल्याने कोणतेही नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. जळजळ, खाज किंवा इतर त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.