Ulta Vada Pav Recipe in Marathi: घरच्या घरी बनवा नाशिकचा प्रसिद्ध उलटा वडापाव; जाणून घ्या सोपी रेसिपी

Vishal Gangurde

लसूण चटणी तयार करा

उलटा वडापाव बनविण्यासाठी खोबऱ्याचा किस, शेंगदाणे,मीठ, लसूण, जीरे, तिखट हे मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून जाडसर लाल लसूण चटणी तयार करून घेणे.

Garlic | Canva

हिरवी चटणी तयार करा

हिरवी चटणी करण्यासाठी मिक्सरमध्ये कोथिंबीर, पालक, पुदिना,डाळ्या, मीठ, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, आलं बारीक करून हिरवी चटणी तयार करणे.

Green Chilli | Yandex

बटाट्याची भाजी कशी तयार कराल?

बटाट्याची भाजी बनविण्यासाठी बटाटे उकडून घ्या आणि सोलून घ्या. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून जीरे , आले, लसूण, मिरची पेस्ट तयार करून घेणे.

Ulta Vada Pav Recipe in Marathi | Yandex

बटाट्याची भाजी तयार

त्यानंतर धने जीरे पूड, आमचूर पावडर, काळमीठ, गरम मसाला, तिखट, मीठ घालून बटाट्याची भाजी तयार करुन घेणे.

Ulta Vada Pav Recipe in Marathi | Yandex

तळण्यासाठी बेसन पीठ तयार करा

एक वाटी बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, तिखट, ओवा मिक्स करून घ्या. त्यात पाणी घालून बेसन पीठ तयार करुण घेणे.

Ulta Vada Pav Recipe in Marathi | Yandex

भाजीच्या टिक्क्या

बटाट्याच्या भाजीच्या टिक्क्या तयार करून घेणे.

ulta vada pav | Yandex

पावाची लादी घ्या

पावाचे दोन भाग तयार करून त्यात प्रथम लाल लसणाची चटणी ठेवावी. त्यानंतर त्यात बटाट्याची टिक्की ठेवा. पुढे पावाच्या दुसऱ्या बाजूला हिरवी चटणी लावून घ्या.

pav | Yandex

उलटा वडापाव तयार

पाव बेसन पिठात बुडवून गॅसवर कढईतील गरम तेलात मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घ्या. त्यानंतर तयार झालेला उलटा वडापाव चटणीबरोबर खाऊ शकता.

Ulta vada pav | Yandex

Next: झटपट आणि चवदार बटाट्याचे पराठे घरी बनवा; जाणून घ्या सोपी पद्धत

Paratha | Yandex
येते क्लिक करा