अंतराळात दोन ब्लॅक होल्स एकमेकांवर आदळले; वेग ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Surabhi Jayashree Jagdish

दोन ब्लॅक

लायगोने (LIGO) दोन ब्लॅक होल्स एकमेंकांवर आदळल्याचं शोधलं आहे ज्यामुळे वैज्ञानिकही थक्क झाले आहेत.

कोणी लावला शोध?

नेचरच्या अहवालानुसार, हा शोध अमेरिकेत उभारलेल्या लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (LIGO) ने लावला आहे.

सर्वात मोठे ब्लॅक होल्स

असं म्हटलं जातंय की, हे लायगोने शोधलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे ब्लॅक होल्स आहेत.

फॉरबिडन ब्लॅक होल्स

यांची फिरण्याची गती इतकी वेगवान होती की, वैज्ञानिकांनी त्यांना फॉरबिडन ब्लॅक होल्स असं नाव दिले.

फिरण्याचा वेग

यामागचं कारण असं की, भौतिकशास्त्राच्या मॉडेल्सनुसार इतक्या वेगाने फिरणारे ब्लॅक होल्स तयार होणं जवळपास अशक्य मानलं जातं.

नवीन ब्लॅक होल

या दोन्ही ब्लॅक होल्सच्या आदळल्याने जो नवीन ब्लॅक होल तयार झाला त्याची फिरण्याची गती प्रति सेकंद जवळपास 40 इतकी होती. वैज्ञानिकांनी त्याला GW231123 असे नाव दिले आहे.

कसे तयार झाले?

सध्या संशोधक या विषयावर अभ्यास करत आहेत की, हे फॉरबिडन ब्लॅक होल्स नक्की कसे तयार झाले आणि इतक्या वेगाने का फिरतात.

जुन्या काळातील अवशेष

हे ब्लॅक होल्स विश्वाच्या सुरुवातीच्या काळाची माहितीही देऊ शकतात कारण हे त्या काळातील अवशेष असण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा