साम टिव्ही ब्युरो
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात लग्नबंधनात अडकणार आहे.
अलिकडेच वनिताने तिचे होणाऱ्या पतीसोबतचे रोमॅंटिक फोटो पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
वनीताच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधल्या वनिताचे सर्व कलाकार मित्र मैत्रीण तिच्या हळदीला उपस्थित होते.
नम्रता संभेराव सोबतच अभिनेत्री रसिक वेंगुर्लेकर, चेतना भट, शिवाली परब, प्रियदर्शनी, ओंकार राऊत, ईशा डे अनेक कलाकार वनिताच्या हळदीत मज्जा करत आहेत
हळदीनिमित्त सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे खास कपडे परिधान केले आहेत.
अभिनेत्री वनिता खरातने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे.