Satish Daud
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी कायम चर्चेत असते.
शिवांगीने 2013 साली तिने 'खेलती है जिंदगी ऑंख मिचोली' या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
त्यानंतर शिवांगी जोशी 'बेगुसराय' या मालिकेत दिसली. या मालिकेत ती पूनम ठाकुरच्या भूमिकेत दिसली होती.
'बालिका वधू 2' या मालिकेतील आनंदीच्या भूमिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली.
शिवांगी जोशी आज 37 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. मालिकेच्या एका भागासाठी शिवांगी जवळपास 1.5 लाख मानधन घेते.
नुकतेच शिवांगीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवांगी खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांनी तिला ब्यूटी क्वीन म्हणून संबोधलं आहे.
शिवांगी जोशीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.