साम टिव्ही ब्युरो
कनिका मान एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
झी टीव्हीवरील टीव्ही मालिका "गुड्डन तुमसे ना हो पायेगा"मधून ती प्रसिद्ध आहे.
ती मूळची हरियाणातील पानिपतची आहे.
कनिकाचा जन्म ७ ऑक्टोबर १९९३ रोजी हरियाणा येथे झाला.
तिने शालेय शिक्षण एमजेआर पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले.
कनिका मानने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.
तिने कॉलेजमध्ये पहिल्यांदा रॅम्प वॉक केला.
तिने मिस इंडिया एलिट 2015 मध्ये मिस कॉन्टिनेंटलचा किताब जिंकला होता.
तिने रॉकी मेंटल आणि दाना पानी सारख्या काही पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.