Saam Tv
प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात हळद असते.
उन्हाळा सुरू झाला की, चेहऱ्याचे रंग रूप अगदी बदलून जाते.
वाढत्या उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडते. त्यावेळेस तुम्हाला हळद खूप फायदेशीर ठरते. कशी ते जाणून घेऊया.
हळदीमध्ये कर्क्युमिन अॅंटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात. त्याने चेहऱ्याला ग्लो येतो.
चेहऱ्यावर सतत घाम येत असेल तर फोड येतात.
तुम्ही अशा वेळेस औषधी आणि अॅंटीबॅक्टेरियअल गुणधर्म असलेली हळद लावू शकता.
हळद औषधी आहे. त्याने डार्क स्पॉट्स, खाज, रॅशेस येत नाहीत.
हळद स्किनचा रंग एक सारखा करण्यास मदत करते.