Shivani Tichkule
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर नुकतेच लग्नबंधनात अडकले.
राणा दा आणि पाठक बाई खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती पत्नी झाले आहेत.
हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर यांचं शाही थाटात रिसेप्शनसोहळा पार पडला.
या रिसेप्शनसोहळ्यादरम्यान हार्दिक-अक्षयाने मॅचिंग कपडे परिधान केले आहे.
अक्षयाने जांभळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे तर हार्दिकने जांभळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केला आहे.
या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी अरविंद सावंत उपस्थित होते.
हार्दिक-अक्षयाच्या जीवनातील एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
हार्दीक आणि अक्षया दोघांनी लग्न मनापासून एन्जॉय केलं.