Sakshi Sunil Jadhav
पोटाच्या तक्रारीने आज दिवस त्रस्त राहील. तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दिवस बरा आहे.
आज नागपंचमी. हिंदूंचा महत्त्वाचा सण. आजच्या दिवशी विशेष शिवउपासना, नाग उपासना करणं फलदायी ठरेल.
करिअरच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय आणि बैठका आज पार पडतील. जवळच्या लोकांच्या सहकार्याने मोठी भरारी घ्याल.
भाग्याला पुष्टी देणारा आजचा दिवस आहे. जे कराल ते ठरवून कराल आणि यश खेचून आणाल.
आपले महत्त्व कुटुंबीयांना जाणवेल. आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा येतील आणि त्या तुम्ही योग्यरीत्या पार पाडाल. दिवस चांगला आहे.
मनाने आनंदी असणार आहात. नवनवीन संकल्पने भरलेला दिवस आहे. इतरांना बरोबर घेऊन जाल.
जोडीदाराच्या तब्येतीसाठी खर्च करावा लागेल. टाळू म्हणून खर्च टळणार नाहीत. पैशाचे योग्य नियोजन आज करणे गरजेचे आहे.
जोडीदाराच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल. कलात्मक गोष्टी नवनवीन संकल्पना, बहरणार आहेत. जुन्या ओळखी आणि परिचयामधून फायदा होईल.
कामामध्ये एक प्रकारची सुसूत्रता येईल. सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहाल. दिवस चांगला आहे.
आज नागपंचमी शिव उपासना महत्वाची आणि फलदायी ठरणार आहे. चांगल्या वार्ता कानी येतील. दिवस प्रसन्न आहे.
केलेल्या कष्टाचे चीज होईल. मात्र लगेचच फळ नाही मिळणार. धनासाठी करण्यात येणारी खटपट आज दुपारनंतरच केलेली बरी.
नवीन दिशा, नवीन आशा घेऊन कामाला लागाल. संकल्प पूर्तीचा दिवस आहे. वरिष्ठांकडून विशेष सहकार्य मिळेल. दिवस संमिश्र आहे.