Door-Window Jammed In Monsoon | पावसाळ्यात घराच्या खिडक्या-दरवाजे फुगून जाम होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता

पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने लाकडी वस्तू जसे की फर्निचर, कपाटं, दार, खिडक्या यांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्या खराब होतात.

Door Window Jammed In Monsoon | Yandex

लाकडी वस्तू

पावसाळ्यात लाकडी वस्तूंना वाळवी लागते किंवा काहीवेळा ओलाव्यामुळे या वस्तू फुगून खराब होऊ लागतात. काही घरगुती उपाय पाहूयात

Door Window Jammed In Monsoon | Yandex

ऑयलिंग किंवा वॅक्सिंग

तेल लावण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. दार-खिडक्यांना तेल लावल्याने ते फुगून गच्च बसणार नाहीत.

Door Window Jammed In Monsoon | Yandex

पॉलिश करून घेणे

लाकडी दरवाजे वेळच्यावेळी पॉलिश करून घेतले तर ते लवकर खराब होत नाहीत. पॉलिश केल्यामुळे दरवाज्याला लागलेली बुरशी, वाळवी किंवा छिद्रे नष्ट होतात.

Door Window Jammed In Monsoon | Yandex

स्वच्छ करण्याची पद्धत

जर आपल्याला पावसाळ्यातही लाकडी दरवाजा स्वच्छ करायचा असेल तर, ओल्या कपड्याने स्वच्छ करा. पाण्याऐवजी कपडात इसेंशियल ऑईल घालून देखील स्वच्छ करू शकता.

Door Window Jammed In Monsoon | Yandex

मेणबत्तीचा चुरा

खिडक्या-दारांच्या घट्ट बसण्याची समस्याही दूर करण्यासाठी सर्वप्रथम मेणबत्ती चुरा करा आणि चुरलेली मेणबत्ती घट्ट झालेल्या कडीवर, लॉकिंग सिस्टमवर, दरवाजाचे हँडलमध्ये भरा आणि तीन चार वेळा उघडबंद करा. असे केल्यास जाम झालेल्या गोष्टी लगेच सैल होतील आणि सहज उघडतील.

Door Window Jammed In Monsoon | Yandex

मोहरीचे तेल

अनेक वेळा दारे खिडक्या उघडल्यावर चर- चर आवाज येतात. तेव्हा एका कोरड्या कपड्यावर मोहरीच्या तेलाचे काही थेंबी ओता. या कपड्याने लोखंडी कडी, दरवाजे आणि खिडक्या पुसा असे कल्याने ते सहज उघडता येईल.

Door Window Jammed In Monsoon | Yandex

बंदच ठेवा

पावसाळ्यात अनेक वेळा लाकडी दरवाजे-खिडक्या फुगतात, त्यामुळे ते घट्ट होतात आणि सहज बंद होत नाहीत. तेव्हा घराचे दरवाजे आणि खिडक्या फुगल्या असतील तर त्यांना शक्यतो बंदच ठेवा. कारण उघडे ठेवल्याने ते आणखीन फुगण्याची शक्यता असते.

Door Window Jammed In Monsoon | Yandex

Next : Nora Fatehi | नोराचा हा लूक पाहून चाहत्यांनी लावला कपाळाला हात!

Nora Fatehi Photos | Saam Tv
येथे क्लिक करा...