Manasvi Choudhary
मालवणी स्टाईल विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. सध्या ओल्या काजूची भाजी हा पदार्थ लोकप्रिय आहे.
ओल्या काजूचा उसळ करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
ओल्या काजूची उसळ बनवण्यासाठी ओले काजू, खोबरं, लसूण, टोमॅटो, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, हिंग, मीठ, गूळ तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर कढईत गरम तेलामध्ये हिंग, मोहरी, जिरं यांची खमंग फोडणी तयार करा.
यानंतर मिश्रणात कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्या. संपूर्ण मिश्रणात मालवणी मसाला घाला आणि चांगले परतून घ्या.
नंतर या मिश्रणात काजू छान परतून घ्या. हळद आणि मसाला घालून मिश्रणत ढवळून घ्या.
मिश्रणात गरम पाणी घालून झाकण ठेवून एक उकळी येऊ द्या
मिश्रणात मीठ, गूळ घालून मंद गॅसवर हे सर्व दहा ते पंधरा मिनिटे उकळत ठेवा शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गॅस बंद करावा
ओल्या काजूची उसळ गरमा गरम भाता, भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व्ह करा.