Saam Tv
नाशिकला खूप मोठा इतिहास आहे. नाशिकला ऐतिहासिक वारसा देखील आहे.
गोदावरी नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. बारा ज्योतिर्लिंगपैकी एक त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबक नाशिक येथेच आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिक शहरापासून २८ किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
कुशावर्त तीर्थ हा त्र्यंबकेश्वरच्या मध्यभागी स्थित आहे. कुशावर्त तीर्थ हे २१ फूट खोलीत नैसर्गिक पाण्याचे झरे असताना १७५० साली एक कुंड बांधले गेले होते. कुशावर्तात छोटे-मोठे मंदिर आहे.
रामकुंड हा नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात आहे. या रामकुंडावर वनवासादरम्यान प्रभू राम यांनी स्थान केल्याची मान्यता आहे.
पंचवटीत प्रसिद्ध काळाराम मंदिर आहे. या मंदिराजवळ ५ वटवृक्षांचा समुह आहे. हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला आहे. त्यामुळे त्यास पंचवटी म्हटलं झाले.
नाशिक शहरापासून ५ किमी अंतरावर पांडव लेणी आहेत. ही लेणी २५०० वर्षांपूर्वीची आहे. या लेण्यामध्ये बुद्धस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने आहेत.
सुला वाईन यार्ड हा नाशिक शहरापासून १२ किमी अंतरावर आहे. सुला व्हिनयार्ड्स भारतातील आघाडीची द्राक्षरस निर्माता कंपनी आहे.
नाशिक शहर हे गंगापूर रस्त्यावर ८ किमीच्या अंतरावर श्री सोमेश्वर महादेवचे मंदिर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे.