Ankush Dhavre
आयपीएल २०२३ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे.
या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत.
तसेच चौकार आणि षटकारांचा पाऊस देखील पाहायला मिळाला आहे.
कोण आहेत आयपीएल २०२३ स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज जाणून घ्या.
शिवम दुबेने १०२ मीटरचा षटकार मारला होता.
मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज नेहाल वाढेराने १०१ मीटरचा षटकार मारला होता.
रहमनुल्लाह गुरबाजने देखील १०१ मीटरचा षटकार मारला होता.
लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काईल मेयर्सने ९९ मीटरचा षटकार मारला होता.
तर शिवम दुबेने ९७ मीटरचा देखील षटकार मारला आहे.