Monsoon Picnic Tourism: धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळणारे धबधबे आणि हिरवाईचा साज पाहायचाय? मग ही TOP 10 ठिकाणं नक्की यादीत ठेवा

Sakshi Sunil Jadhav

येऊर हिल्स, ठाणे

ठाण्यापासून 12 किमी अंतरावर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ सुंदर येऊर हिल्स स्टेशन आहे. तिथे तुम्ही दाट जंगल, धुक्याने वेढलेले डोंगर आणि लहान-मोठे धबधबे पाहू शकता.

monsoon picnic spots

अक्सा बीच

शांत वातावरण, , स्वच्छ किनारा आणि जोडीदारासोबत सूर्यास्त पाहण्यासाठी अक्सा बीच प्रसिद्ध आहे. तुम्ही मालाड पश्चिमपासून १० किमी अंतरावर या सुंदर ठिकाणाला भेट देऊ शकता.

picnic spots near Mumbai

भिवपुरी धबधबा

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाजवळ, माथेरानच्या पायथ्याशी हा सुंदर धबधबा आहे. मुंबईपासून जवळ असलेला हा धबधबा ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे.

picnic spots near Mumbai

पांडवकडा धबधबा

सुमारे 100 मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पावसाळ्यात नक्की पाहा. खारघर, नवी मुंबई येथील सेंट्रल पार्कजवळ हे सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता.

Mumbai monsoon tourism

गाढेश्वर

पनवेल शहरापासून सुमारे 8 किमी अंतरावर गाढेश्वर नदी आणि प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही पिकनिकसाठी इथे जाऊ शकता.

Mumbai monsoon tourism

भगीरथ धबधबा

वांगणी स्टेशनपासून जवळपास 4 किमी अंतरावर डोंगररांगांमधून कोसळणारा भगीरथ धबधबा आहे. ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

family picnic place

कोंडेश्वर धबधबा

बदलापूर पूर्वेकडून जवळपास 6 किमी अंतरावर भोज-दहिवली गावाजवळ कोंडेश्वर धबधबा आहे. विकेंड ट्रिपला तुम्ही इथे जाऊ शकता.

Mumbai travel guide

कर्जत फार्महाऊस

हिरवाईने नटलेले फार्महाऊस, स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधबे कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

outdoor adventure Mumbai

वज्रेश्वरी

भिवंडीपासून सुमारे 30 किमी अंतरावर ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे कुंड पाहू शकता. तसेच प्राचीन मंदिर आणि आसपासचे धबधबेही तुम्हाला आकर्षित करतील.

hill stations near Mumbai

माथेरान

नेरळपासून 8 किमी अंतरावर, रायगड जिल्ह्यात माथेरान आहे. पावसाळ्यात धुक्यात लपलेलं दृश्य पाहण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

green landscapes Maharashtra

NEXT: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

low carb protein foods
येथे क्लिक करा