Shruti Vilas Kadam
फूड आणि कुकिंग तज्ज्ञांच्या मते, टोमॅटो सामान्य तापमानात ठेवणे योग्य ठरते. फ्रिजच्या कमी तापमानामुळे त्याची चव, रंग, पोत आणि सुगंध प्रभावित होऊ शकतो.
टोमॅटो साठवण्यापूर्वी ते धुतले असल्यास स्वच्छ कपड्याने पूर्णपणे पुसून घ्या. त्यावर ओलावा राहिल्यास टोमॅटो लवकर खराब होण्याची शक्यता असते.
टोमॅटोचा हिरवा देठ काढून ते प्लेटमध्ये उलटे म्हणजे देठाचा भाग खाली येईल अशा पद्धतीने ठेवू शकता. या पद्धतीने ते जास्त काळ ताजे ठेवण्यास मदत होऊ शकते.
टोमॅटो साठवताना त्यात ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या. त्यांना बंद डब्याऐवजी खुल्या टोपलीत ठेवणे चांगले.
टोमॅटो ठेवण्याची जागा थंड आणि सावलीची असावी. थेट सूर्यप्रकाश पडणाऱ्या ठिकाणी ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकतात.
खूप पिकलेले टोमॅटो इतर भाज्यांसोबत ठेवू नका. ते खराब झाल्यास जवळच्या भाज्यांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा टोमॅटोची प्युरी करून वापरता येते.
टोमॅटो कापल्यानंतर उरलेला भाग हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये साठवणे योग्य ठरते. तसेच टोमॅटोची प्युरी करूनही फ्रिजमध्ये ठेवता येते.