Tomato Benefits For Skin: इंस्टंट ग्लोसाठी चेहऱ्यावर लावा 'हा' टॉमेटॉ पेस्ट, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स होतील कमी

Shruti Vilas Kadam

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे त्वचेची काळजी घेण्यास मदत होते. टोमॅटोचा रस काढून कापसाने चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

Skin Care

चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी

चेहरा खूप तेलकट होत असेल तर टोमॅटोचा वापर करू शकता. टोमॅटोचा गर चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी पाण्याने धुवा.

Skin Care

उन्हामुळे आलेले टॅनिंग कमी करण्यासाठी

उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर टोमॅटो आणि दही एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Skin Care

चेहऱ्यावरील डागांसाठी

चेहऱ्यावर डाग असतील तर टोमॅटोचा गर वापरून पाहू शकता. टोमॅटोचा रस कापसाने डाग असलेल्या जागी लावा. काही मिनिटांनी चेहरा धुवा.

Hair Care | Saam tv

कोरडी त्वचा मऊ ठेवण्यासाठी

चेहरा कोरडा पडत असेल तर टोमॅटोचा गर आणि अर्धा चमचा मध एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १० मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा धुऊन मॉइश्चरायझर लावा.

Skin Care | Saam Tv

सुरकुत्यांची काळजी घेण्यासाठी

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. टोमॅटोचा गर चेहऱ्यावर काही मिनिटे लावा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

Skin Care

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी

चेहऱ्यावरील धूळ आणि मळ काढण्यासाठी टोमॅटोचा गर आणि थोडे ओट्स एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी हलक्या हाताने चेहरा धुवा.

Face care | Saam TV

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Skin Care Tips

Lipstick Cause Cancer: रोज लिपस्टिक लावल्याने खरंच कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Lipstick Cause Cancer | Saam Tv
येथे क्लिक करा