Jagdish Patil
मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
मिथुन : व्यवसायात वाढ होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : वादविवाद टाळावेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तूळ : मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.