Sakshi Sunil Jadhav
कठोर निर्णय घ्यायची वेळ येईल. डगमगायचं नाही. आधी मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ही उक्ती लक्षात ठेवावी.
महत्वाच्या कामात गाफिल राहू नका. सतर्क राहावं, विचार करून निर्णय घ्यावा. श्रीकृष्णाची उपासना करावी.
नवीन परिचय होतील, फायदा करून घ्यावा. व्यवहारांत लक्ष ठेवावं, संबंध आणि व्यवहार यात गल्लत होता कामा नये.
स्वभावात चलाखी राहील. कोणी गैरसमज करून घेणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाचीही सहज चेष्टा करणं टाळावं.
संपूर्ण दिवस कार्यमग्न राहील. सामाजिक किंवा वैयक्तिक जीवनात लक्ष द्यायला वेळ पण भेटणार नाही. रात्री निवांत झोप लागेल.
प्रेमप्रकरणात गुंतुन राहिलात तर नाहक त्रास होईल. "नंतर विक्रम प्रथम योजना" ही म्हण लक्षात ठेवा. विवाह इच्छुकांचे शुभ योग आहेत.
पत्नीसोबत वाद टाळावेत. रागावर नियंत्रण ठेवणे. मित्रमंडळी सोबत दिवस घालवावा. ईष्ट देवतेची उपासना वरदान ठरेल.
समाजात कौतुक होईल. आनंद वार्ता मिळेल. फक्त होरपळून जायला नको. अतिउत्साही स्वभावात नियंत्रण ठेवणे.
"आपुला आपण करावा विचार, तरावया पार भवसिंधु" ही म्हण लक्षात ठेवा. इतरांची मदत करण्याआधी स्वतः कडे लक्ष द्या. काही प्रमाणात स्वार्थी व्हावं.
संकटांची सुट्टी होईल. गणपतीची उपासना करावी. गरिबांना दुधाचे गोड पदार्थ दान करावेत." राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येती तदनंतरे " हे वाक्य लक्षात ठेवा.
संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अपत्त्यांसोबत वेळ घालवावा. होणारी चिडचिड नियंत्रणात ठेवावी. मारुतीची उपासना करावी.
अतिशय आनंदी दिवस आहे. शनि महाराजांची अनन्य साधारण कृपा होईल. "क्षण त्याने कूतो विद्या, कण त्यागे कूतो धनम्" प्रत्येक गोष्टींचा योग्य उपयोग करावा.