Manasvi Choudhary
एप्रिल महिना हा आर्थिक महिना म्हणून ओळखला जातो.
आर्थिक वर्षाच्या सुरूवातील म्हणजे एप्रिल महिन्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत.
आज १ एप्रिल २०२४ पासून कोणत्या गोष्टी बदलणार आहेत. हे जाणून घ्या
पीएफ खाते
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने एप्रिल २०२४ पासून पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर केले जाण्याचे स्पष्ट केले आहे.
टॅक्स
जर तुम्ही ३१ मार्च पर्यंत टॅक्स फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला नवीन टॅक्स (Tax) प्रणाली ही १ एप्रिल २०२४ पासून डिफॉल्ट मानली जाईल.
फास्टॅग केवायसी
ज्या फास्टॅग वापरकर्त्यांनी अद्याप फास्टॅग केवायसी केलेले नाही. त्यांना आजपासून फास्टॅगवरुन टोल भरता येणार नाही.
NPS खाते लॉग-इन प्रक्रिया
आजपासून NPS खाते लॉग-इन प्रक्रिया ही वेगळी असणार आहे. PFRDA ने लॉगिनसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे.
एलपीजी सिलिंडर
तेल कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. निवडणुकांपूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांनी कपात केली आहे. परंतु, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.