ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तम मराठी अभिनेत्री म्हणून तितिक्षा तावडेची ओळख आहे.
अभिनेत्री तितिक्षा तावडे यांचा जन्म 3 जुलै 1990 ला डोंबिवलीमध्ये झाला.
तिने शालेय शिक्षण चंद्रकांत पाटेकर विद्यालय डोंबिवली येथून पूर्ण केले.
शालेय जीवनात तितिक्षा उत्तम खेळाडू होती. क्रिकेट या खेळामध्ये विशेष रस होता. इयत्ता 10वी पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ती क्रिकेट खेळली आहे.
तर पदवी शिक्षण मुलूंड वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केले. तर आय.एच.एम , गोवा येथून तिने हॉटेल मॅनेजमेण्टची पदवी घेतली.
तितिक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे यांची बहीण आहे.
अभिनेत्री खुशबू तावडे सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अभिनय करते.