Akkha Masoor recipe: उसळ खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा अख्खा मसूरची झणझणीत सुकी भाजी

Surabhi Jayashree Jagdish

अख्खा मसूर

अख्खा मसूरची झणझणीत सुकी भाजी थोड्या मसाल्याने, कमी वेळेत आणि घरातल्या साध्या गोष्टींनी सहज तयार होते. हिवाळ्यात किंवा रोजच्या जेवणात ही भाजी चविष्ट लागते.

मसूर नीट भिजवून घ्या

अख्खा मसूर किमान ४–५ तास भिजवल्यास तो पटकन शिजतो. भिजल्यामुळे त्याची टेक्स्चरही मऊ आणि चविष्ट होतं.

प्रेशरकुकरमध्ये शिजवा

भिजवलेला मसूर २–३ शिट्ट्या देऊन प्रेशरकुकरमध्ये शिजवा. तो फक्त मऊ होईल एवढाच शिजवा. जास्त शिजला तर भाजी पातळ होते.

कांदा-लसूण-आलं यांची फोडणी

कढईत तेल टाकून कांदा, लसूण आणि आले चांगले परतून घ्या. हे तडका मसूराच्या चवीचा मुख्य भाग असतो. या फोडणीमुळे भाजीला सुगंध आणि झणझणीतपणा येतो.

मसाले नीट भाजून घ्या

हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर आणि गरम मसाला नीट परतून घ्या. मसाले भाजल्याने त्यांचा कच्चा स्वाद जातो.

कमी पाणी

झणझणीत सुकी भाजी हवी असेल तर पाणी अगदी कमी वापरा. मसूर शिजताना जेवढं पाणी उरतं तेवढ्यावरच भाजी परतून घ्या. जास्त पाणी राहिल्यास भाजी कोरडी लागत नाही.

गाजर, कोथिंबीर आणि लिंबाचा रस

थोडं बारीक चिरलेलं गाजर, कोथिंबीर आणि शेवटी लिंबाचा रस घातल्याने भाजीला ताजेपणा मिळतो. या घटकांमुळे मसूराची झणझणीत चव छान लागते.

Akkha Masoor Recipe | Social Media

शेवटी तूप घाला

भाजी शिजल्यावर तूपाचा छोटासा चमचा घातल्यास चव दुप्पट होते. त्यामुळे भाजी अगदी खमंग सुकी तयार होते.

Swarna Bhasma Ghee | Yandex

Taj Mahal: सिमेंट नसतानाही कसा बांधला गेला इतका मजबूत ताजमहाल?

येथे क्लिक करा