साम टिव्ही ब्युरो
सध्याच्या युगात इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे.
जरावेळ जरी मोबईल अथवा संगणक मध्ये इंटरनेट नसेल तरी आपल्याला काय सुचत नाही.
राऊटरमधून इंटरनेट ट्रान्समिट होण्याची दिशा वर्तुळाकार आणि वरून खालच्या दिशेने असावी.
तुमचं राऊटर घराच्या मध्यभागी आणि उंच जागी असावं. शक्यतो घराच्या ३/४ म्हणजेच (तीन चतुर्थांश) उंचीवर असावं.
वाय-फाय राऊटर कपाटात किंवा ड्रॉवर मध्ये बंदिस्त ठेवू नका. तसंच अगदी कोपऱ्यात किंवा भिंतीला खेटून ठेऊ नका.
राऊटर इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जवळ तसेच पारदर्शक पृष्ठभाग म्हणजेच (काच, आरसा, मार्बल टाईल्स इत्यादि) जवळ ठेऊ नका.
ज्यावेळेस इंटरनेटवर काम करायचे आहे यावेळी तुमच्या wifi router च्या शेजारीच बसा. तुम्हाला सिग्नल स्ट्रेंथ चांगली मिळेल.
तुमच्या wifi वरून किती सदस्य इंटरनेट वापरत आहेत ते चेक करून घ्या.