ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात बहुतेक लोकांची त्वचा कोरडी होत असते.
त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी नागरिक वारंवार लोशन वापरत असतात.
म्हणून आज तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल फार गुणकारी आहे.
खोबरेल तेलात फॅटीफॅसिड आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
रात्रीच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही खोबरेल तेलाचा समावेश करा.
तुम्ही खोबरेल तेलात कॅाफी पावडर आणि थोडे बेसन मिक्स करुन त्वचा मुलायम बनवू शकता.
तुम्ही चेहऱ्यावर एलोवरा जेल आणि खोबरेल तेल लावू शकता. यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही.
NEXT: अन्याची कातिल अदा, फोटोंनी उडवला धुराळा