Bharat Jadhav
सध्या पुरुषांमध्ये लांब दाढी ठेवण्याचा ट्रेंड सुरू आहे. परंतु दाढी ठेवल्यानंतर त्याला व्यवस्थित लूक दिला तरच आपल्या व्यक्तिमत्व भारदस्त दिसत असते.
योग्य काळजी न घेतल्याने दाढीचे केस कोरडे, निर्जीव आणि खराब होऊ लागतात. दाढीचा संसर्ग देखील होत असतो.
तुम्ही दाढी ठेवत असाल तर दाढीचा लूक नीट करून घ्या. दाढीवरील लूक भारदस्त करायचा असेल तर दाढीचे केस मऊ केले पाहिजेत.
केसांवरच नव्हे तर दाढीवरही हेअर मास्क लावणे गरजेचे आहे. धुळीमुळे केस खराब होत असतात.
दाढीचे केस मऊ करण्यासाठी तुम्ही दही मास्क लावू शकता. केसांवर दही लावावी. साधारण अर्धा तास तशीच ठेवा त्यानंतर पाण्याने धुवून काढा.
नारळाच्या तेलात अनेक पोषक घटक असतात, जे ओलावा देतात. नारळाचे तेल दररोज दाढीच्या केसांना लावू शकतात.
केसांची वाढ, चमक आणि मुलायमपणा वाढवण्यासाठी कोरपड जेल उत्तम आहे. कोरफड जेल आठवड्यातून दोनदा दाढीवर लावता येते.
दाढीतून गंध येऊ नये असे वाटत असेल तर जोजोबा तेल लावा. यामुळे दाढीचे केसही मऊ होत असतात.
जर तुमचं कामानिमित्त जास्त वेळ बाहेर राहत असाल तर दाढीला सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन लावल्याने उन्हामुळे दाढीच्या केस जळणार नाहीत. दाढीचे केस अधिक चमकतील.
येथे क्लिक करा