Thugao Hidden Waterfall: गर्दी नकोय तर नाशिकच्या पेठमध्ये लपलाय 'हा' धबधबा; पांढऱ्या शुभ्र धबधब्यात भिजण्याची मजा वेगळीच

Surabhi Jayashree Jagdish

आकर्षक धबधबा

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेला थुगाव हा एक आकर्षक धबधबा आहे.

प्रसिद्ध नाही

आदिवासी पाड्याजवळ असल्याने हे ठिकाण अजूनही अनेकांना माहित नाही. पावसाळ्यात इथले सौंदर्य अप्रतिम असते आणि शांत वातावरणात निसर्गाचा आनंद घेता येतो.

कसं जायचं?

तुम्हीही या विकेंडमध्ये धबधब्यावर भिजायला जायचा प्लान करत असाल तर कसं जायचं ते जाणून घ्या.

नाशिक

नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरकडे जावं. त्र्यंबक गावातून पुढे पेठ तालुक्याच्या दिशेने गाडीने जावं.

अंतर

पेठपासून थुगाव गाव सुमारे १२–१५ किलोमीटर अंतरावर आहे.

थुगाव गाव

थुगाव गावात पोहोचल्यावर गावकऱ्यांकडून वाट विचारून धबधब्याच्या दिशेने चालत जावं लागतं

ट्रेक

थुगाव गावातून धबधब्यापर्यंत सुमारे १५–२० मिनिटांचा पायवाटेचा ट्रेक आहे. याठिकाणी जास्त लोकं नसल्याने तुम्ही मस्त मजा घेऊ शकता.

Nerle waterfall: सांगलीजवळील 'या' धबधब्यावर भिजण्याची मजा वेगळीच; पाहा one day trip प्लान

येथे क्लिक करा