Ahupe Waterfall: या विकेंडला भीमाशंकरच्या जवळच्या 'या' धबधब्यावर नक्की भिजून या; शांतता आणि सौंदर्याची मजा घ्या

Surabhi Jayashree Jagdish

अहुपे धबधबा

अहुपे धबधबा हा भीमाशंकरच्या जवळ असलेला एक अप्रतिम, निसर्गरम्य आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला धबधबा आहे.

आकर्षण

पावसाळ्यात इथे कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज, दाट धुके आणि हिरवळ यामुळे पर्यटक आणि ट्रेकर्सना खूप आकर्षित करतो.

प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट

अहुपे हा एक प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट असून इथून भीमाशंकरचा परिसर, घाटवाटांचा नजारा आणि दूरवर पसरलेले जंगल पाहायला मिळतं.

सौंदर्य

धबधबा उंच डोंगरातून खाली कोसळतो आणि आसपास शांतता, निसर्गसौंदर्य, पक्ष्यांचे आवाज आणि स्वच्छ हवा यामुळे ही जागा मनाला शांत करणारी आहे.

देखावा

अहुपे घाटातून खाली पाहिल्यास सह्याद्री पर्वतरांगेचा अद्भुत देखावा दिसतो.

कसं जाल?

सर्वप्रथम पुणे किंवा मुंबईहून कर्जत गाठा. त्यानंतर कर्जतहून खांडस या गावाकडे जावं.

वेस व्हिलेज

खांडस हे अहुपे ट्रेकचं बेस व्हिलेज आहे. खांडस ते अहुपे सुमारे आठ ते दहा किलोमीटरचा ट्रेक आहे.

अंतर

मुंबईपासून खांडस गाव सुमारे ९० ते १०० किलोमीटर आहे. पुण्याहून खांडस गाव सुमारे ८० ते ९० किलोमीटर आहे.

Wakad Tourism: पुण्याजवळ फिरायचंय? मग एका दिवसात वाकडची ट्रिप नक्की प्लान करा

येथे क्लिक करा