Surabhi Jayashree Jagdish
आजच्या काळात चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे खूप लोकांमध्ये आढळते. बहुतेक लोक हाय बीपीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.
दीर्घकाळ उच्च रक्तदाबाची समस्या हृदयासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
बीपीचं सामान्य प्रमाण एका निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब 120/80 mmHg इतका असतो.
बीपी वाढल्यावर काही लक्षणं दिसू लागतात, जसं की डोकेदुखी, गरगरणं, बेशुद्ध पडणं आणि हृदयाचे ठोके जलद होणं.
बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण एका विशेष मसाल्याचा वापर करू शकता.
कोथिंबीरीचं पाणी बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन K, पोटॅशियम आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते, जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.
कोथिंबीरीचं पाणी पिणं अतिशय सोपं आहे. एका ग्लास पाण्यात कोथिंबीर पावडर मिसळा आणि हे पाणी रिकाम्या पोटी सेवन करा.