Surabhi Jayashree Jagdish
लिव्हर कॅन्सरची लक्षणं अनेकदा खूप उशिरा दिसून येतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
लिव्हर कॅन्सरचे सुरुवातीचे एक प्रमुख लक्षण म्हणजे सतत कमी होणारे वजन, ज्याकडे लक्ष द्यायला हवं.
जर कोणत्याही आजाराशिवाय, डाएट किंवा व्यायामाशिवाय वजन कमी होत असेल, तर याचा अर्थ लिव्हर व्यवस्थित कार्य करत नाही.
खाण्यात मन न लागणं किंवा थोडेसं खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटणं, ही लिव्हरशी संबंधित समस्यांची चिन्हं आहेत.
पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला सतत वेदना जाणवणे हेही लिव्हरच्या आजाराचे संकेत असू शकतात.
जर कोणत्याही कारणाशिवाय वारंवार उलटी होत असेल किंवा मळमळत असेल, तर तात्काळ लिव्हरची तपासणी करून घ्यावी.
ताप येणे, शरीरावर पिवळसरपणा दिसणे, पोट सुजणे आणि पोट फुगणे ही लक्षणे देखील लिव्हर कॅन्सरशी संबंधित असू शकतात.