ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोणत्याही गोष्टींची माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो.
मात्र गुगलवर काय सर्च करावे आणि काय करू नये हे देखील माहित असणे महत्वाचे आहे.
सर्वांकडे मोबाईल उपलब्ध असल्याने आपण हवे ते गुगलवर सर्च करतो.
गुगलवर सर्च केल्यास गुगल सर्वच प्रश्नांची उत्तर देतोच असे नाही, तर काहीवेळेस आपण अडचणीत देखील येऊ शकतो.
अनेकवेळा लोक गंमत म्हणून अशा गोष्टींचा शोध घेतात, ज्याची त्यांना माहितीही नसते, पण पोलिस त्यांच्यावर कारवाई करू शकतात. खरं तर Indian security agencies गुगल सर्च अॅक्टिव्हिटीवर सतत लक्ष ठेवतात.
गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा याचा शोध घेऊ नका अशा परिस्थितीत तुम्ही हा किंवा असा कोणताही विषय सर्च केला तर तुम्हीही संशयाच्या भोवऱ्यात येऊ शकता आणि कारवाई होऊ शकते.
चाइल्ड क्राइम कंटेंट किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती केवळ मनोरंजनासाठी सर्च केली तर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
अनेकांना छंदामुळे किंवा प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस असतो, ते शस्त्रास्त्रांबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि दररोज शस्त्रास्त्रांबद्दल सर्च करत असतात, परंतु त्यांच्या कृतीमुळे ते अडचणीत येऊ शकतात.