Nanemachi waterfall: या विकेंडला धबधब्यावर जायचा विचार करताय? मग अगदी जवळ असलेल्या नानेमाचीचा प्लान करू शकता

Surabhi Jayashree Jagdish

नानेमाची धबधबा

नानेमाची धबधबा हा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेला एक प्रसिद्ध आणि अत्यंत सुंदर धबधबा आहे.

पर्यटकांसाठी लोकप्रिय

धबधब्याचं सौंदर्य, ट्रेकिंगचा अनुभव आणि सभोवतालचं हिरवंगार जंगल यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे.

नैसर्गिक कुंड

नानेमाची धबधबा हा उंच डोंगराच्या माथ्यावरून खोल दरीत कोसळतो. धबधब्याच्या पाण्याचा वेग प्रचंड असून खाली एक मोठा नैसर्गिक कुंड तयार होतो.

कसं जायचं?

सर्वप्रथम मुंबई किंवा पुण्याहून महाड शहर गाठा. यावेळी महाड शहरातून पोलाडपूर रस्त्याने झारवली गावाकडे जा.

बेस व्हिलेज

झारवली हे नानेमाची धबधब्याचं बेस व्हिलेज आहे.

ट्रेक

झारवली गावात गाडी पार्क करून पुढे जंगलातून चालत सुमारे एक ते दीड तासाचा ट्रेक करावा लागतो.

स्थानिक गाईड

वाटेवर डोंगर उतार, घसरणारे दगड आणि ओढे असतात. त्यामुळे ट्रेकिंग अनुभव असलेल्या व्यक्तींनीच हा ट्रेक करावा. स्थानिक गाईड सोबत घेणं सुरक्षित ठरतं.

Wakad Tourism: पुण्याजवळ फिरायचंय? मग एका दिवसात वाकडची ट्रिप नक्की प्लान करा

Wakad Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा