Surabhi Jayashree Jagdish
जेव्हा किडनीचे कार्य कमी होऊ लागते, तेव्हा शरीर काही सुरुवातीचे संकेत देते. मात्र, अनेक वेळा लोक हे संकेत दुर्लक्षित करतात.
किडनी निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणं लघवीत दिसू लागतात. जर लघवीची मात्रा अचानक बदलली, तर तो एक गंभीर इशारा असू शकतो.
जर लघवीत फेस येऊ लागला किंवा त्यात रक्त दिसू लागलं तर हा स्पष्ट संकेत आहे की, किडनी योग्य प्रकारे फिल्ट्रेशन करत नाही.
किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास ‘एरिथ्रोपॉयटिन’ या हार्मोनची निर्मिती कमी होते. ज्यामुळे शरीरात लाल रक्तपेशींचे प्रमाण घटतं.
किडनी जर योग्यरित्या सोडियम आणि पाणी बाहेर टाकू शकली नाही. तर चेहरा, टाचे आणि पायांमध्ये सूज येऊ लागते.
किडनी फेल्युअरची इतर लक्षणं म्हणजे भूक कमी लागणं. उलटी, मळमळ, श्वास घेण्यास त्रास होणं, त्वचेवर खाज येणं आणि कोरडेपणा जाणवणं.
जर ही लक्षणे सतत दिसत राहिली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरुवातीला निदान आणि उपचार केल्यास किडनीचे नुकसान टाळता येऊ शकते.