Cancer: कॅन्सरची ही लक्षणं शरीरात लपलेली असतात

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरची लक्षणं

कॅन्सरची काही सुरुवातीची लक्षणं अनेकदा खूप सामान्य वाटतात, त्यामुळे ती लोकांकडून दुर्लक्षित केली जातात.

वेळीच ओळखणं

हीच लक्षणं शरीरात काही गंभीर बदल सुरू असल्याचा इशारा देत असतात. तज्ज्ञांच्या मते, काही लपलेली संकेत वेळेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे

सततचा थकवा जाणवणं

पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल, तर तो शरीरात वाढणाऱ्या कॅन्सर पेशींचा परिणाम असू शकतो.

रक्तस्त्राव होणं

हलक्या धक्क्यानेही निळसर डाग पडणं किंवा नाकातून वारंवार रक्त येणं हे रक्ताशी संबंधित आजारांचे (उदा. ल्युकेमिया) लक्षण असू शकतं.

रात्री घाम येणं

रात्री झोपेत अंगाला अनावश्यकपणे प्रचंड घाम येत असेल, तर ते केवळ तापमानामुळे नाही तर लिम्फोमा किंवा इतर प्रकारच्या कर्करोगांशी संबंधित असू शकतं.

अनपेक्षित वजन कमी होणे

आहार किंवा व्यायामात कोणताही बदल न करता अचानक वजन कमी होणं हे अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये दिसून येतं. शरीरातील कर्करोग पेशी ऊर्जेचा जास्त वापर करतात, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होतं.

कायमस्वरूपी वेदना किंवा सूज

कोणत्याही कारणाशिवाय शरीराच्या एखाद्या भागात दीर्घकाळ वेदना, सूज किंवा गाठ जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा