Shraddha Thik
निसर्गरम्य दृश्ये आणि स्ट्रॉबरीसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेले हिल स्टेशन म्हणजे महाबळेश्वर. येथे थंड वातावरण असल्यामुळे हनिमूनचा प्लान करू शकता.
महाराष्ट्रात तुम्ही हनिमूनसाठी लोणावळ्याला जाऊ शकता. येथील वातावरण हिवाळ्या व्यतिरीक इतर ऋतूंमध्येही थंड असते त्यामुळे लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हनिमून ठिकाण ठरेल.
कोलाड हे हनिमूनसाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात कोलाड आणखीनच सुंदर बनते.
महाराष्ट्रात रोमँटिक सहलीसाठी अलिबाग हे कपल्समध्ये खूप लोकप्रिय आहे. समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक किल्ल्यांचा अनुभवासाठी जोडपी येथे येतात
समुद्रकिनारा, Water Sports अशा गोष्टी अनुभवण्यासाठी तारकर्ली हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम डेस्टिनेशन्समध्ये गणले जाते. तारकर्लीमधील जंगलात रोमँटिक ठिकाणांचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
महाराष्ट्रातील औरंगाबाद हे हनिमूनसाठीही चांगले ठिकाण आहे. येथे पाहण्यासारखे इतिहासप्रेमी असलेले कपल हे अजिंठा एलोराच्या प्राचिन लेण्या पाहण्यासाठी उत्तम ठिकाण ठरेल.
नयनरम्य लँडस्केप्ससह थंड वातावर असलेले महाराष्ट्रातील खंडाळा या ठिकाणी तुम्ही हनिमूनसाठी जाऊ शकतात. येथे तुम्हाला फिरण्यासाठी अनेक पर्याय मिळतील.