Shraddha Thik
बहुतेक लोकांना डोळ्यांखाली Dark Circles येतात. हे तणाव, झोपेची कमतरता, जीवनशैलीतील बदल आणि इतर कारणांमुळे असू शकते. ते तुमचे सौंदर्य बिघडवते.
डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी किचनमधल्या काही पदार्थांचा वापर करा. चला, जाणून घेऊया.
थंड दुधाच्या मदतीने काळी वर्तुळे दूर करता येतात. हे डोळे आणि त्वचा दोन्हीसाठी फायदेशीर आहे. मुती कपड्यात भिजवून डोळ्यांखाली लावा.
टोमॅटोमुळे काळी वर्तुळे कमी होतात आणि त्वचा मुलायम होते. 1 चमचा टोमॅटोच्या रसात । चमचा लिंबाचा रस मिसळून डोळ्यांखाली लावा.
कच्च्या बटाट्याचा रस डोळ्यांवर लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात. हा रस सुती कापडाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा.
संत्री आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्यापेक्षा ते त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्याचे काही थेंब ग्लिसरीन मिसळून टाकल्याने काळी वर्तुळे कमी करता येतात.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आढळते. याच्या मदतीने डार्क सर्कलची समस्या कमी होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी ते लावल्याने फायदा होऊ शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.