Shraddha Thik
बहुतेक लोकांना हे माहित नसेल की हार्मोनमुळे त्यांच्या शरीरात चरबी जमा होऊ शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोर्टिसोल हार्मोनमुळे वजन कमी करणे खूप कठीण असते.
जर शरीरात कोर्टिसोल हार्मोन किंवा स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढली तर तुमच्या पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते.
डॉक्टरांच्या मते लठ्ठपणा अनेक गंभीर आणि घातक आजारांना आमंत्रण देतो.
जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला कोर्टिसोलची पातळी कमी करण्यावर भर द्यावा लागेल.
शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दररोज योगासने करून कोर्टिसोल हार्मोनच्या वाढत्या पातळीला नियंत्रित करू शकता.
या टिप्सचे अनुसरण करून, तुमची जीवनशैली निरोगी बनवा, तणावाची पातळी नियंत्रित ठेवा आणि लठ्ठपणापासून मुक्त व्हा.