लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाल्यास शरीरात होऊ लागतात 'हे' बदल

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हरमध्ये इन्फेक्शन

ही एक गंभीर अवस्था आहे, ज्यामध्ये लिव्हर योग्य प्रकारे काम करणं थांबवतं. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते.

कारणं

लिव्हरमध्ये इन्फेक्शन हेपाटायटीस, फॅटी लिव्हर, फूड पॉइझनिंग, मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा, ऑटोइम्यून आजार आणि काही औषधांचं अधिक सेवन यामुळे होऊ शकते.

लक्षणं

लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाल्यास शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये.

सतत थकवा

लिव्हर नीट कार्य करत नसल्यास शरीरात टॉक्सिक पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

कावीळ

लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाल्याने शरीरात बिलीरुबिन पिगमेंटचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळसर दिसू लागतात.

पोटात सूज व वेदना

लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाल्याने पोट सुजणं, पोटदुखी आणि जडपणा जाणवणं अशी समस्या दिसू शकते.

भूक न लागणं

भूक न लागणे, मळमळ, उलट्या आणि अपचन यासारख्या तक्रारीही होऊ शकतात.

लघवीचा रंग बदलणं

लिव्हर इन्फेक्शनमुळे लिव्हर बिलीरुबिनचे प्रमाण संतुलित ठेवू शकत नाही. त्यामुळे लघवीचा रंग गडद किंवा गडद पिवळा होऊ शकतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा