ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेह पातळी वाढली की त्याचा परिणाम तुमच्या किडनीपासून ते डोळ्यांपर्यंत सर्व काही खराब करू शकतो.
जर तुम्हाला सतत गोड पदार्थांची इच्छा असेल, तर ते तुमच्या साखरेची पातळी जास्त असल्याचे लक्षण असू शकतं. कारण ते तुमच्या शरीराच्या इन्सुलिन पातळी आणि उर्जेच्या संतुलनावर परिणाम करतं.
जेव्हा रक्तात साखर वाढते तेव्हा तुम्हाला अचानक थकवा जाणवतो आणि उर्जेची कमतरता भासते.
जास्त साखरेमुळे त्वचाकोरडी होऊ शकते किंवा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
पायांमध्ये सूज येणं हे देखील सूचित करतं की तुमची साखर जास्त आहे.
जास्त साखर खाल्ल्याने तुमच्या मूडवर परिणाम होऊ शकतो. जास्त साखरेमुळे चिडचिड आणि मूड स्विंग होऊ शकतात.
जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, अचानक भूक वाढणे ही देखील उच्च साखर पातळीची लक्षणे आहेत.