Kidney Cancer: किडनी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' बदल

Surabhi Jayashree Jagdish

किडनी कॅन्सर

किडनी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये शरीरात काही विशिष्ट बदल दिसून येतात, परंतु अनेकदा ही लक्षणे अगदी सौम्य किंवा अदृश्य असतात

निदान

यामुळे वेळेवर निदान करणं कठीण जातं. पहिल्या स्टेजमध्ये गाठ खूप लहान असते आणि ती केवळ किडनीपुरतीच मर्यादित असते.

पाठीच्या खालच्या भागात वेदना

पाठीच्या खालच्या भागात किंवा बाजूला एक प्रकारची वेदना किंवा अस्वस्थता जाणवते

लघवीतून रक्त येणे

हे किडनी कॅन्सरचे सर्वात सामान्य आणि महत्त्वाचे लक्षण आहे. पहिल्या स्टेजमध्ये हे रक्त कमी प्रमाणात असू शकते, ज्यामुळे लघवीचा रंग किंचित गुलाबी, तपकिरी किंवा लालसर दिसू शकतो.

पोटाच्या बाजूला गाठ

काही प्रकरणांमध्ये, पोटाच्या बाजूला किंवा पाठीच्या खालच्या भागात एक लहान गाठ जाणवू शकते. ही गाठ सामान्यतः वेदनादायक नसते.

थकवा

अचानक आणि अकारण थकवा जाणवणे हे एक सामान्य लक्षण आहे. हे लक्षण कॅन्सरमुळे शरीरावर येणाऱ्या ताणामुळे किंवा काहीवेळा रक्तक्षयामुळे (anemia) दिसू शकते.

लक्षणं

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, विशेषतः जर ती वारंवार होत असतील, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या आणि योग्य तपासण्या करून घ्या.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा