Blocked heart arteries: शरीरातील हे मोठे बदल सांगतात तुमच्या हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात

Surabhi Jayashree Jagdish

हृदयाच्या समस्या

हृदयाच्या कोणत्याही समस्या असतील तर लगेच लक्षात येतील असं आपल्याला वाटतं. मात्र अनेकदा लक्षणं दिसून देखील आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

इतर आजार

ज्यांचं वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला इतर आजार जसं की, कोलेस्ट्रॉल, मधुमेह अशांना हृदयाच्या आजारांचा धोका अधिक असतो.

लक्षणं काय?

हृदयाच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वीही काह प्रकारची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया.

मळमळ आणि अॅसिडिटी

हृदयाच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी मळमळ, अपचन, किंवा अॅसिडिटीसारखं वाटू शकतं. यामध्ये काही वेळा उलट्यांचा त्रासही होऊ शकतो.

हातापर्यंत वेदना पसरणं

छातीतून सुरुवात होऊन डाव्या हातापर्यंत जाणारं दुखणं हे देखील हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याचं लक्षण मानलं जातं.

छातीत अस्वस्थता

जर तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होत असतील तर छातीत दडपण, जडपणा, दुखणं, जळजळ किंवा घट्ट वाटणं असा त्रास होऊ शकतो.

चक्कर येणं

भूक नसणं, पाणी कमी पिणं किंवा पटकन उभं राहिल्यास चक्कर येणं देखील एक लक्षण मानलं जातं. अशावेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.