ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैकी अनेकजणांना मासे खाणे खूप आवडते.
मासे खाणे हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
मधुमेहाच्या रुग्णांनी मासे खाल्ल्याने इन्सुलिन संवेदनशीलता वाढते तसेच रक्तातील साखर टिकून राहण्यास मदत होते.
गरोदर महिलांच्या आहारात मासे असल्याने त्यांच्यासह त्यांच्या बाळाला फायदा होतो.
माशांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन डी असते जे त्वचा चमकदार दिसण्यासाठी फायदेशीर ठरते.
माशांमध्ये प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे पचनसंस्था योग्य ठेवण्यास मदत होते.
माशांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजांचे प्रमाण आढळते जे हाडे मजबूत बनण्यास मदत करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते जे आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉन्सचा विकास स्थिर ठेवण्यास मदत करते.