Todays Horoscope: आज प्रेमामध्ये छोटे वाद होण्याची शक्यता; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

मातृसौखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. व्यवसायामध्ये प्रसिद्धी प्रगती होण्याचे योग आहेत.

वृषभ

महत्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागणार आहेत. प्रेमामधून लाभ होतील.

मिथुन

जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. कोणतेही निर्णय घ्यायचे असतील तर ते एकट्याने घ्यावे लागतील.

कर्क

मनस्वी दिवस जगण्याचा आजचा आपला मानस आहे. त्याला कोणी तुम्हाला मागे ओढू शकत नाही.

सिंह

सरकारी कामामध्ये व्यत्यय आणि अडथळा दिसतो आहे. महत्त्वाचे कामे दुपारनंतर करून घ्या. भगवंताची उपासना करावी.

कन्या

प्रेमामध्ये थोडी वादावादी होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींच्या संपर्कामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत.

तूळ

आपल्या सहकाऱ्यांमुळे कामाच्या बाबतीत उंची गाठू शकणार आहात. आपली समाजात पत वाढेल.

वृश्चिक

सहज सोप्या गोष्टी घडणारा आजचा दिवस आहे. संतती आणि नातवंडं यांच्याकडून चांगली बातमी मिळणार आहे.

धनु

अडथळ्यांची शर्यत पार करणं हे आजसाठी ठरलेलं आहे हे मनाशी ठरवूनच बाहेर पडा. काही वेळेला निर्णय न घेता येणं अशा गोष्टी होऊ शकतात.

मकर

चिकाटीने आणि चिवटपणे यश खेचून आणाल. कोर्टाच्या कामांमध्ये सुद्धा यश मिळणारा दिवस आहे.

कुंभ

गुडघेदुखी सांध्याचे आजार किंवा जुनी दुखणी डोके वर काढतील. नको त्या गोष्टीत वेळ खर्च झाल्याचा आज पश्चाताप होईल.

मीन

शेअर्स लॉटरीमध्ये फायदा संभावतो आहे. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा