Palshe waterfall: विकेंड जवळ आलाय, बॅगा भरा आणि निघा; ताम्हिणी घाटाजवळ असलेल्या 'या' धबधब्यावर नक्की भिजा

Surabhi Jayashree Jagdish

पळसे धबधबा

पळसे धबधबा हा ताम्हिणी घाटाजवळील एक अप्रतिम, शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला धबधबा आहे.

हिरवळ

पावसाळ्यात हिरवळीने वेढलेलं आणि कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज कानात घुमणारे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आकर्षक आहे.

कमी गर्दी

पळसे धबधबा हा मुळशी तालुक्यात असून तो फारसा प्रसिद्ध नसल्यामुळे गर्दीपासून दूर आहे.

नैसर्गिक सौंदर्य

धबधब्याच्या आसपासचा परिसर शांत, हिरवळयुक्त आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेला आहे.

ट्रेकिंग

फोटो काढण्यासाठी, ट्रेकिंगसाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

कसं जायचं?

पुण्यातून मुळशीमार्गे ताम्हिणी घाटाच्या दिशेने गाडीने जा. मुळशी धरण पार करून ताम्हिणी घाटाच्या वाटेवर असलेल्या पळसे गाव गाठा.

रस्ता

पळसे गावात गाडी पार्क करून चालत धबधब्यापर्यंत जायचं. चालण्याचा रस्ता सुमारे वीस ते तीस मिनिटांचा आहे

तयारी

याठिकाणी जाण्यची वाट जंगलातून आणि डोंगरउतारावरून जाते, त्यामुळे योग्य तयारीने जा.

अंतर

पुणे ते पळसे धबधबा सुमारे ६५ ते ७० किलोमीटर आहे. प्रवासाचा वेळ साधारणपणे दोन ते अडीच तास लागतो

Wakad Tourism: पुण्याजवळ फिरायचंय? मग एका दिवसात वाकडची ट्रिप नक्की प्लान करा

येथे क्लिक करा